esakal | दीपक मारटकर खून प्रकरण : आणखी तिघांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak_Maratkar_Shivsena

दीपक मारटकर यांचा गुरुवारी (ता.१) मध्यरात्री कसबा पेठेतील गवळीआळीमध्ये पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून खून केला होता.

दीपक मारटकर खून प्रकरण : आणखी तिघांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
पुणे : शिवसेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणी आणखी तिघांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीपक मारटकर यांचा गुरुवारी (ता.१) मध्यरात्री कसबा पेठेतील गवळीआळीमध्ये पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून खून केला होता. या घटनेनंतर फरासखाना पोलिसांनी तत्काळ अश्‍विनी कांबळे, महेंद्र सराफ आणि निरंजन म्हंकाळे या तिघांना अटक केली होती. तर शनिवारी (ता.३) आणखी तिघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणावर परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी बारकाईने लक्ष घालून गुन्ह्याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

 विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!​

आर्थिक बाजूनेही विचार सुरू 
बुधवार पेठेमध्ये मारटकर आणि अश्‍विनी कांबळे हे राजकीयदृष्ट्या एकमेकांविरुद्ध होते. त्यांच्यामध्ये राजकीय कारणावरून वाद होत होते. मात्र, या कारणाबरोबरच अन्य कोणती कारणे आहेत का, याचाही तपास फरासखाना पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये दीपक मारटकर यांच्या हालचालींबाबत एक स्थानिक व्यक्ती संशयित आरोपींना माहिती देत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. घटनेच्या दिवशी मारटकर हे बाहेर बसले असल्याबाबतची खबरही त्यानेच दिली होती, त्यानंतर खुनाची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image