आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे तृप्ती देसाई पुणे पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

ससून रुग्णालयामध्ये बनावट कागदपत्रे देऊन दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिले जातात, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी आक्रमक पध्दतीने आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी देसाईंना ताब्यात घेतले आहे.

पुणे : भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना आज (गुरुवार) बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. 

तृप्ती देसाई यांच्या कात्रज येथील राहत्या घरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. चार जुलैपासून पुढील आठ दिवसांत ससुन रुग्णालयातील डॉक्टरांना काळे फासण्याचा इशारा त्रुप्ती देसाई यांनी एका आंदोलना दरम्यान दिला होता. त्यानंतर त्रुप्ती देसाईंवर बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी पोलिसांनी तृप्ती देसाईंना ताब्यात घेण्यात आले.

ससून रुग्णालयामध्ये बनावट कागदपत्रे देऊन दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिले जातात, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी आक्रमक पध्दतीने आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी देसाईंना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Pune Police arrested Trupti Desai