Crime : पुणे पोलिसांची बंगळुरूमध्ये मोठी कारवाई; सर्वात मोठ्या लोन ॲपचे रॅकेट उध्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Police

Crime : पुणे पोलिसांची बंगळुरूमध्ये मोठी कारवाई; सर्वात मोठ्या लोन ॲपचे रॅकेट उध्वस्त

Pune Police Burst Fraud Bank Loan Racket : पुणे पोलिसांनी बंगळुरू येथे सर्वात मोठ्या लोन ॲपचे रॅकेट उध्वस्त करत 18 जणांना अटक केली आहे. याटोळीने फ्रॉड लोन ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा: Bacchu Kadu : नवनीत राणा थेटचं बोलल्या; बच्चू कडूंनी स्वतःवरचं नियंत्रण सांभाळावं

स्वप्निल नागटिळक, श्रीकृष्ण गायकवाड, धीरज पुणेकर, प्रमोद रणसिंग, मुमताज कुमठे, सॅम्युअल कंदीयल पिता इब्राहिम, मोहम्मद मनियत पिता मोहिदू अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे असून हे सर्व जण कॉल सेंटरमध्ये काम करत होते.

हेही वाचा: Video : मोदी थांबू शकतात तर, आपण का नाही? पाहा गुजरातमध्ये नेमकं काय घडलं

अटक करण्यात आलेले आरोपी लोन अॅपद्वारे कर्ज घेतलेल्या लोकांना कॉल करून अश्लील भाषा तसेच शिवीगाळ करून धमकी देण्याचे काम करत होते. रॅकेट उद्धस्त करताना पोलिसांनी आरोपींकडून 48 मोबाईल, 56 बँक खाती, 56 संगणक, 167 डेबिट कार्ड, आधारकार्ड, मतदार कार्ड यासह अनेक कागदपत्रांसह 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.