Bacchu Kadu : नवनीत राणा थेटचं बोलल्या; बच्चू कडूंनी स्वतःवरचं नियंत्रण सांभाळावं

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार हल्लाबोल केला.
Navneet Rane
Navneet Rane Sakal

Navneet Rane On Bacchu Kadu : काही दिवसांपूर्वीच अपक्ष आमदार बच्चू कडूंनी कार्यकर्त्याला मारहार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर अनेक स्तरातून बच्चू कडू यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता या प्रकरणावर आमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी कडूंना मोलाचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार हल्लाबोल केला.

Navneet Rane
Video : मोदी थांबू शकतात तर, आपण का नाही? पाहा गुजरातमध्ये नेमकं काय घडलं

नवनीत राणा म्हणाल्या की, नुकत्याच घडलेल्या घटनेतून बच्चू कडू यांचे स्वतःच्या रागावरील नियंत्रण सुटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बच्चू कडूंना रागाच्या बाबतीत स्वतःवरच नियंत्रण संभाळण्याची गरज आहे, असा सल्ला राणा यांनी दिला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कार्यकर्ते नेत्यांना निर्माण करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर अशाप्रकारे हात उचलणे त्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

Navneet Rane
Ajit Pawar : पहिले उद्धव ठाकरे अन् मग एकनाथराव; अजित पवारांचं हटके उत्तर

दरम्यान, कार्यकर्त्याला मारहाण न केल्याचा खूलासा बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र, समोर आलेल्या व्हिडिओमधून असा प्रकार घडल्याचे राणा यांनी म्हटले आहे. अशा घटनांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे बच्चू कडूंनी रागावर आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

Navneet Rane
Viral Video : क्रिएटिव्हिटीचा कहर! बटर चिकन आईस्क्रीम विथ ग्रीन चटणी

उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

यावेळी नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवरही भाष्य करत जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जर त्यांनी संघर्ष केला असता तर, आजची परिस्थिती आली नसती. शिवसेनेचे कार्यकर्ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून, बाळासाहेबांना मानणारे खरे कार्यकर्तेच शिंदेंसोबत राहतील. तर बळजबरीनं येणारे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात राहतील असा खोचक टोला राणा यांनी लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com