

Civil Order Containment Grid: President Narendra Pawar Threatens Aggressive Protests
Sakal
पुणे : भटके विमुक्त समाजाबाबत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गिरीश गायकवाडविरोधात भटके विमुक्त समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तसेच या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजप भटके विमुक्त मोर्चातर्फे देण्यात आला आहे. यावेळी समाजातील शेकडो बांधव, महिला, युवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.