

Constable Sushant Ranavare Saves Another Life with Timely CPR
Sakal
बालेवाडी : बाणेर येथील रहिवासी असणारे पोलीस शिपाई सुशांत काशिनाथ रणवर हे येरवडा येथे सायंकाळी सहाच्या दरम्यान गेले असता तेथील गोल्फ क्लब चौक नागपूर चाळ कडे जाणाऱ्या बस स्टॉप जवळ एका व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे दिसले. रणवरे यांनी तात्काळ त्यांची गाडी थांबून सदर व्यक्तीला सीपीआर उपचार केले व हॉस्पिटल मध्ये भरती केले.वेळेवर उपचार मिळाल्याने त्या व्यक्तीचे प्राण वाचले. यापूर्वी ही (ता.९) नोव्हेंबर रोजी रणवरे यांनी बाणेर येथे चारचाकी वाहन चालवत असाच हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीस वेळेत रुग्णालयात भरती करून त्यांचे प्राण वाचवले होते.