

Controversy erupts after Budhwar Peth combing operation in Pune
Esakal
Pune Budhwar Peth: बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत ४१ इमारतींची झडती घेण्यात आली; तर शेकडो महिला-पुरुषांची तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन बांगलादेशी महिला आणि काही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे. तर, अमली पदार्थासह एकाला अटक करण्यात आली. शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात अवैध धंदे सुरू असून, काही बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.