

पुण्यातील येरवडा परिसरात एका पोलीस शिपायाने एका व्यक्तीचे प्राण वाचवल्याचे हृदयस्पर्शी प्रसंग घडला आहे. पोलीस शिपायाचे धाडसाचे कौतूक होत आहे. येरवडा गोल्फ कल्ब चौक जवळ एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आला, तिथे बघ्यांची गर्दी जमली पण मदत करण्यासाठी पुढे कोणी आले नाही. पोलीस शिपाई सुशांत रणवरे यांनी धाडस दाखवले आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचवले.