
Nana Peth Hoardings Removed in Joint Action by PMC and Police
Esakal
आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबियांसह टोळीला अटक झाली. यातील काही जण पोलीस कोठडीत तर काही जण न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, आंदेकर टोळीला पुणे महानगर पालिका आणि पोलिसांनी मोठा दणका दिला. नाना पेठेतील आंदेकरांचं बेकायदेशीर बांधकाम आणि अनधिकृत होर्डिंग हटवण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासून पुणे महानगर पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई केली जात आहे.