मोर्चा व असे नियोजन कधीच पाहिले नाही:पोलिस

सचिन निकम : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 सप्टेंबर 2016

पुणे - आतापर्यंत माझ्या कारकिर्दीत मी अनेक मोर्चांमध्ये बंदोबस्तासाठी होतो. पण मराठा क्रांती मूक मोर्चातील शिस्त आणि नागरिकांची वागण्याची पद्धत ही आतापर्यंत कधीच पाहिली नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया एका पोलिस उपनिरीक्षकाने दिली. 

पुणे - आतापर्यंत माझ्या कारकिर्दीत मी अनेक मोर्चांमध्ये बंदोबस्तासाठी होतो. पण मराठा क्रांती मूक मोर्चातील शिस्त आणि नागरिकांची वागण्याची पद्धत ही आतापर्यंत कधीच पाहिली नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया एका पोलिस उपनिरीक्षकाने दिली. 

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी आज (रविवार) पुण्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला व मुली अग्रभागी होत्या. त्यानंतर पुरुष असे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही असे वातावरण होते. नागरिक स्वयंप्ररणेने आणि स्वयंशिस्तीने आपापल्यापरीने मोर्चात सहभागी झाले होते. लाखो लोक असूनही पोलिस यंत्रणेवर कोणताही ताण जाणवत नव्हता. पोलिसांनीही अत्यंत चोख नियोजन केले होते. वाहतूक व्यवस्था आणि मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. 
 

या मोर्चाविषयी बोलताना पोलिस उपनिरीक्षक विजय शिंदे म्हणाले, की आम्हाला या मोर्चाचे नियोजन करण्यात जास्त अडचणी आल्या नाहीत. नागरिक व्यवस्थितपणे पोलिसांनी दिलेले आदेश पाळत आहेत. ते स्वतःच व्यवस्थितरीत्या आणि नियोजनबद्ध तयारीने मोर्चात आल्याने आमच्यावर जास्त ताण नाही. नागरिकांनी वाहतुकीचेही नियम पाळून आम्हाला सहकार्य केले आहे. या मोर्चातील शिस्त ही खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे. 

Web Title: Pune Police praises organizers of Maratha Morcha