Pune BJP Leader Caught Red-Handed in Gambling Den RaidEsakal
पुणे
Pune : रिकाम्या कारखान्यात रंगलेला रम्मीचा डाव, भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
Pune : पुणे पोलिसांनी सोमवारी जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत पुणे पोलिसांनी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलंय. तळजाई इथं एका रिकाम्या कारखान्यात जुगाराचा खेळ रंगला होता.
खराडी रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर चर्चेत आलेल्या पुणे पोलिसांनी सोमवारी जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत पुणे पोलिसांनी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलंय. भाजप पदाधिकाऱ्यासह २ ते ३ जणांनी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं खळबळ उडालीय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.

