esakal | Pune: भरती परीक्षेत बनावट उमेदवारांसह तिघे ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगार ताब्यात

पुणे : भरती परीक्षेत बनावट उमेदवारांसह तिघे ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदासाठी मंगळवारी झालेल्या लेखी परीक्षेमध्ये दोन बनावट उमेदवार बसल्याचा प्रकार उघडकीस आला. बनावट उमेदवारांसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सिहंगड रस्ता व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाळासाहेब भीमराव गवळी (वय 22, रा. धावडा, भोकरदन, जालना), त्याला मदत करणारा सुरज भोपाळावत (रा.सांजखेडा, औरंगाबाद), विठ्ठल किसनराव जास्वाल (रा.पिंपळगाव, औरंगाबाद) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर जास्वाल यास जनक शिसोदे याने मदत केल्याचे त्यांच्या चौकशीतुन पुढे आले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाणे व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणे : महापालिकेतर्फे २४ ऑक्टोबरला 'प्लॉगेथॉन २०२१’चे आयोजन

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स येथे बनावट उमेदवार बसल्याचा प्रकार पोलिस व पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आला. त्यानुसार, पोलिसांनी बाळासाहेब गवळी यास ताब्यात घेतले. त्याने त्याचा मित्र योगेश कौतिकराव गवळी या उमेदवाराच्या नावाने परीक्षा देत होता. प्रवेशपत्रावरील छायाचित्र व सध्याचे छायाचित्रामध्ये फरक असल्याने पोलिसांना संशय आल्या. चौकशीनंतर बनावट उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राचार्य मकरंद कानपुरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ऍन्ड कम्पुटर ऍप्लिकेशन या केंद्रावर महेश सुधाकर दांडगे या उमेदवाराच्या जागेवर विठ्ठल जास्वाल हा परिक्षा देत होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा, त्यास जनक शिसोदे हा मदत करीत असल्याची माहिती त्याने दिली.

...म्हणून उघडकीस आले बनावट उमेदवार !

लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून परिक्षा केंद्रांवर छायाचित्र काढण्याबरोबरच व्हिडीओ चित्रीकरण केले जात होते. तसेच प्रवेशपत्रावरील छायाचित्र व प्रत्यक्ष छायाचित्र याची तपासणी केली जात होती. त्यावेळी दोन्ही ठिकाणी प्रवेशपत्रावरील छायाचित्र व सध्याचे छायाचित्र यामध्ये पोलिसांना फरक जाणवला. त्यानंतर हे प्रकार उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती अतिरीक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिली.

loading image
go to top