हद्दीचा वाद सोडून पुणे पोलिसांनी वाचविले आत्महत्या करणाऱ्या महिलेचे प्राण

Pune Police saved the life of an elderly woman who was going to commit suicide
Pune Police saved the life of an elderly woman who was going to commit suicide

पुणे : रविवार....वेळ सकाळी साडे आठ वाजताची. "नाना नानी पार्क येथे एक वृद्ध महिला नदीत आत्महत्या करण्यासाठी जात आहे. तिला वाचवा" असा कॉल पोलिस नियंत्रण कक्षातून बीट मार्शल पोलिस कर्मचाऱ्याना येतो. पुढच्या काही मिनिटांतच पोलिस कर्मचारी नदीपात्रात पोचतात आणि वृद्ध महिलेचे समुपदेशन करुन तिच्या कुटुंबाकडे सोपवितात. विशेषत: एरवी हद्दीवरुन भांडणारे पोलिस या घटनेत मात्र पोलिसांनी हद्दीपेक्षाही आपल्यातील संवेदनशीलतेला प्राधान्य देत महिलेचा जीव वाचविण्याची महत्वाची भुमिका बजावली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासुन शहरात दररोज किमान एक ते दोन आत्महत्या होत असल्याची सद्यस्थिती आहे. वेगवेगळ्या कारणानी होत असलेल्या या आत्महत्या केवळ पोलिसांचाच नाही, तर सर्वसामान्य नागरीकांच्यादृष्टिनेही चिंतेची बाब बनली आहे. या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी देखील महत्वाचे पाऊल उचलले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांचे संरक्षण करतानाच आपले सहकारी कोरोनाबाधित होत आहेत, काहींना कोरोनामुळे प्राण गमवावा लागलेला आहे असे असुनही पोलिसही नागरीकांचे जीव वाचविण्यासाठी धडपडत आहेत.

लग्नाच्या पूजेनंतर डीजे लावून सुरू होता डान्स, पोलिसांनी काढली अशी वरात

दरम्यान, रविवारी सकाळी साडे आठ वाजता पोलिस नियंत्रण कक्षातुन पोलिसांना फोन आला. "नाना नानी पार्क येथे एक वृद्ध महिला नदीत आत्महत्या करण्यासाठी जात आहे. तिला वाचवा" असा कॉल पोलिस नियंत्रण कक्षातुन शिवाजीनगर बीट मार्शल पोलिस कर्मचाऱ्याना आला. त्याचवेळी एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी महिलेचे कुटुंबीय खडक पोलिस ठाण्यात झाले. त्याचवेळी खडक पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलिस कर्मचारी देखील महिलेच्या शोधासाठी निघाले. त्यावेळी त्यांना ही नदी पात्रात एक महिला आत्महत्या करण्यासाठी जात असल्याची खबर मिळाली. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तळपे, एकशिंगे, जगदाळे, गिरहे , कोल्हे, यादव, ननवरे असे दोन्ही पुलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी नाना नानी पार्क येथे दाखल झाले. त्यावेळी त्यांना 75 वर्षीय महिला नदीमध्ये आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिस कर्मचाऱ्यानी महिलेला थांबवून तिची विचारपुस केली. त्यानंतर महिलेचे समुपदेशन करून तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर महिलेला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com