esakal | हॉटेल की बेकायदा धंद्याचं कोठार! पुणे-सोलापूर हायवेवरील लॉजवर पोलिसांचा छापा
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Hookah_parlor

पोलिसांनी हॉटेल मालक हनुमंत तुपे यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.  

हॉटेल की बेकायदा धंद्याचं कोठार! पुणे-सोलापूर हायवेवरील लॉजवर पोलिसांचा छापा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील 'हॉटेल मॅजेस्टिक' या बड्या हॉटेलवर हवेलीच्या पोलिस उपविभागीय अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या पथकाने बुधवारी (ता.२४) रात्री छापा टाकला. यावेळी पोलिसांनी बेकायदा चालणारा हुक्का पार्लर उघड केला. या छाप्यात पोलिसांनी हुक्का पार्लरचे ४४ हजार रुपये किमतीचे साहित्य ताब्यात घेतले आहे. 

तर बेकायदा हुक्का पार्लर चालवल्याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलचे मालक हनुमंत भगवान तुपे, चालक सागर हनुमंत तुपे (दोघे रा. हडपसर, पुणे), व्यवस्थापक लालचंद जयसिंग देशमुख (वय ३९), वेटर प्रवीण सदाशिव भागवत (वय २५, रा. फुरसुंगी, ता. हवेली), पुंडलिक मालू गाडेकर (वय ३०, रा. शेवाळवाडी, ता. हवेली), गणेश दत्ता गुंडाळे (वय २०, रा. थेउर फाटा, ता. हवेली) अशा सहा जणांविरोधात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोप्टा अॅक्ट) कलमासह महाराष्ट्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या; पानशेतमधील पीडीत कातकरी कुटुंबाची हाक​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटीस यांना थेऊरफाटा परीसरातील मॅजेस्टीक हॉटेलमध्ये हुक्का पार्लसरसह अनेक अवैध व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्याच्या उद्देशाने बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास स्वतः डॉ. सई भोरे-पाटील, सहाय्यक फौजदार चंदनशिव, पोलीस हवालदार मेहबूब शेख, गुलाबराव वाल्हेकर, सुरेश कांबळे तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड, सुहास पवार यांनी हॉटेलवर छापा टाकला.

गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; थेऊरच्या 'श्री चिंतामणी' मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद​

हॉटेलमध्ये पोलिस येत असल्याचे लक्षात येताच, एक इसम पळत लॉजच्या खाली असलेल्या पूर्वेकडील कॅफेमध्ये जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना सुगंधित हुक्क्यासारखा वास आला. म्हणून कॅफे आणि आतील खोलीची पाहणी केली असता हुक्क्याचे साहित्य आणि व्यवस्थापकासह ३ वेटर आढळून आले.  

दरम्यान सई भोरे-पाटील यांनी वरील तिघांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर चालू असल्याचे आढळून आले. यावर पोलिसांनी हॉटेलची पाहणी केली असता, पोलिसांना हुक्क्याचे फ्लेवर्स आणि इतर साहित्य आढळून आले. तसेच हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही आढळून आले. यानंतर पोलिसांनी हॉटेल मालक हनुमंत तुपे यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.  

'काँग्रेसचं घराणेशाहीचं राजकारण आता संपुष्टात; संसदेत आजवरच्या सर्वांत कमी जागा'​

कोरोनाच्या नियमातून याच हॉटेलला कशी सूट 

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू असताना, आठ महिण्यांपूर्वी हे हॉटेल जुगार, मटका आणि वेश्या व्यवसायासाठी चालू असल्याची बाब पुढे आली होती. या हॉटेलमधील रुम नंबर १०६ मध्ये जुगार खेळणाऱ्या तब्बल अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. या अकरा जणांमुळे लोणी काळभोर, कुंजीरवाडी, कदमवाकवस्ती, थेऊर परिसरातील शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही काळ या हॉटेलमधील अवैध धंदे बंद ठेवण्यात आले होते. मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा या हॉटेलमध्ये अवैध धंदे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. 

कारवाई रोखणारा तगडा ऑफिसर कोण?
हॉटेल मॅजेस्टिकमध्ये हॉटेल आणि लॉजिंगच्या नावाखाली मटका, जुगार, हुक्का पार्लरसह वेश्या व्यवसायसारखे अवैध धंदे चालू असल्याची खबर पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती. लोणी काळभोर पोलिस या हॉटेलकडे दुर्लक्ष करत असल्याने डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मॅजेस्टिकवर छापा टाकण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पथक पुण्याहून रवानाही झाले होते. मात्र पथक लोणी काळभोर हद्दीत येण्यापूर्वीच मॅजेस्टिकमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालत नसल्याचा साक्षात्कार एका वरिष्ठ अधिकाऱ्याला झाला होता. आणि स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पथक कवडीपाट टोलनाक्यावरुन माघारी फिरले होते. यामुळे  हॉटेल लॉजिंगच्या नावाखाली मटका, जुगार, हुक्का पार्लरसारखे अवैध धंदे चालू असतानाही, कारवाई रोखणारा तो तगडा अधिकारी कोण हीच चर्चा सध्या चालू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image