esakal | 'काँग्रेसचं घराणेशाहीचं राजकारण आता संपुष्टात; संसदेत आजवरच्या सर्वांत कमी जागा'
sakal

बोलून बातमी शोधा

pondecherry

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुरुवारी पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर आहेत.

'काँग्रेसचं घराणेशाहीचं राजकारण आता संपुष्टात; संसदेत आजवरच्या सर्वांत कमी जागा'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुदुच्चेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुरुवारी पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणा दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'मतस्यपालन मंत्रालय बनवू' या टिप्पणीचा उल्लेख करत म्हटलं ते हे ऐकूण हैराण झाले. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, मी स्तब्ध झालो होतो. राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांत दोनवेळा मत्स्यपालन मंत्रालयावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता, यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला होता. 

यावेळी सभेत बोलताना त्यांनी म्हटलं की, संपूर्ण भारतातील लोक काँग्रेस पक्षाला नाकारत आहेत. संसदेतील त्यांच्या जागा या आजवरच्या सर्वांत कमी जागा आहेत. काँग्रेसचं सरंजामी आणि घराणेशाहीचं राजकारण आता संपुष्टात येत आहे. भारत आता तरुण, दूरदृष्टी असलेला आणि महत्त्वाकांक्षी देश बनत आहे. 

हेही वाचा - सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्म्ससाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर; असे असतील नवे नियम

पुढे ते म्हणाले की, पुदुच्चेरीसाठी काय जाहीरनामा आहे, असं तुम्ही जर मला विचाराल तर मी म्हणेन, की मला पुदुच्चेरी सर्वोत्तम हवी आहे. एनडीएला पुदुच्चेरी एकदम बेस्ट बनवायची आहे. बेस्ट म्हणजे मला म्हणायचं आहे की, B म्हणजे बिझनेस हब, E म्हणजे एज्यूकेशन हब, S म्हणजे स्पिरीच्यूअल हब आणि T म्हणजे टूरीझम हब होय.


वास्तविकत: पुदुच्चेरीमध्ये आपल्या दौऱ्यादरम्यान मच्छिमार समुदायाला भेटल्यावर राहुल गांधींनी म्हटलं होतं की केंद्रामध्ये वेगळं कृषी मंत्रालय असू शकतं कर मग वेगळं मत्स्यपालन मंत्रालय का नाहीये? त्यांनी म्हटलं होतं की, काँग्रेस सरकार यावर काम करेल. यावर भाजपाने राहुल गांधींवर टीका करत म्हटलं होतं की पंतप्रधान मोदींनी 2019 मध्ये आधीच पशुपालन आणि डेअरीसोबतच मत्स्यपालन मंत्रालयाची स्थापना केली आहे. याबाबत या मंत्रालयाचे मंत्री गिरिराज सिंह यांनी स्वत: राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन ट्विट केलं होतं. मात्र, यावरुन काँग्रेसने पलटवार करत म्हटलंय की, भाजपने आश्वासन दिलं होतं की ते स्वतंत्रपणे मस्त्य पालन मंत्रालयाची निर्मिती करतील. मात्र, असं काही झालं नाहीये. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाल्यानंतर देखील राहुल गांधी यांनी आपल्या केरळ दौऱ्यामध्ये दुसऱ्यांदा याबाबत वक्तव्य केलं आहे. 

loading image