'भाई' बनण्याआधीच पुणे पोलीस आवळणार मुसक्या

police
police
Summary

शहरात शहरात गुन्हेगारी वाढत आहे. विशेष करुन अनेक तरुण मुले गुन्हेगारी जगतात पाय ठेवत आहे.

पुणे- शहरात शहरात गुन्हेगारी वाढत आहे. विशेष करुन अनेक तरुण मुले गुन्हेगारी जगतात पाय ठेवत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक अभिनव योजना आणली आहे. याअंतर्गत भावी गँगस्टर होण्याची शक्यता असलेल्या तरुणांचा शोध घेण्याचं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे. याअतर्गंत प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीतील तरुण गुन्हेगारांची एक लीस्ट तयार करण्यात आली असून पोलिसांना त्यांच्यावर वचक ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. (pune police stop minor rising stars becoming gangster gang criminals)

पुणे पोलिसांनी अशा तरुण गुन्हेगारांवर बारिक लक्ष ठेवणे सुरु केले आहे. अशा गुन्हेगारांचे व्हॉट्सअॅप स्टेटस किंवा ते बनवत असलेले व्हिडिओ यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापणे किंवा रस्त्यावर तलवार हातात घेऊन डान्स करणे किंवा शस्त्राचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी याआधी कारवाई केली आहे.

police
केंद्राची अलपन बंडोपाध्याय यांना नोटीस; होऊ शकतो तुरुंगवास

18 वर्षाखालीस अनेक मुले गँगस्टर होण्याच्या दिशेने झुकले आहेत किंवा गँग बनवण्याचा प्रयत्न करत आहे अशांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेक गँगस्टरवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. गँगस्टर गजा मारणे याला तिहार जेलमधून सोडण्यात आल्यानंतर झालेल्या रॅलीमध्ये भाग घेणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केलीये. शिवाय हिस्ट्री शिटर माधव वघाटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या अनेकांवर कारवाई करण्यात आलीये. गुन्ह्याकडे वळण्याआधीच कमी वयातील मुलांना या जगतापासून दूर ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

police
'अनलॉक'साठी केंद्र सरकारचे नवे नियम

गँगस्टर मारणे, शरद मोहोळ, बापू नायर आणि बंडू अंडेकर हे तरुणांचे प्रेरणास्थाळ बनले आहेत. गँगस्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 'रायजिंग स्टार'च्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी कारवाई आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस कमीशनर अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यात 26 गँगच्या 295 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यादीनुसार 10 गुन्हेगार हद्दपार, 95 तुरुंगात आणि 190 जामिनावर बाहेर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com