Corona Virus : पुणेकरांची मार्केटयार्डात खरेदी-विक्रीसाठी गर्दी; अखेर पोलिसांनी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

शहरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत जाऊ नये यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार, सोमवारी जमावबंदीचा आदेश देण्यात आला. मात्र नागरीकांनी जमावबंदीचा आदेश झुगारुन लावत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनाना वाहतुकीसाठी बंदी घातली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी रस्त्यावरील गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण आले.

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असतानाही मंगळवारी नागरिकांनी त्याचे उल्लंघन करीत भाजीपाला,  गुढ़ीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. काही ठिकाणी पोलिसांनी नागरीकांना माघारी जाण्यास सांगितले, तर बहुतांश गर्दीच्या ठिकाणी पोलिस फिरकलेच नसल्याचे चित्र शहरामध्ये दिसत होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

शहरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत जाऊ नये यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार, सोमवारी जमावबंदीचा आदेश देण्यात आला. मात्र नागरीकांनी जमावबंदीचा आदेश झुगारुन लावत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनाना वाहतुकीसाठी बंदी घातली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी रस्त्यावरील गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण आले. मात्र बुधवारी असलेला गुढ़ीपाडवा व बंदीच्या भितीमुळे भाजीपाला, स्वयंपाकासाठीच्या वस्तु खरेदी करण्यासाठी किराणा दुकाने, महात्मा फुले मंडई, मार्केट यार्ड भाजी मंडईसह शहराच्या उपनगरामधील भाजी मंडई, मॉलमधील किराणा विभाग,भाजी विभागमध्ये गर्दी केली.

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले, मात्र त्यांना अटकाव करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी नागरीकांना समजावुन सांगत माघारी पाठविले, मात्र बहुतांश गर्दीच्या ठिकाणी पोलिस दिसुन आले नाहीत. त्यांच्यावर कारवाई ही झाली नाही. त्यामुळे संचारबंदीला नागरिकांनी अजुनही गांभीर्यने घेतले नसल्याची सद्यस्थिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police take Action Against Farmers and Citizens gathered in Pune Marketyard Corona Virus