esakal | 'न्यू इअर'च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क; कराताहेत 'अशी' कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

'न्यू इअर'च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क; कराताहेत 'अशी' कारवाई

- रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या 7 पबवर कारवाई 

'न्यू इअर'च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क; कराताहेत 'अशी' कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नव्या वर्षाचे स्वागत करताना नागरिकांना मद्यपींचा त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने प्रशासनाने अवैध दारुच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यावर भर दिला आहे. गावठी दारु, दारु निर्मितीची रसायने व देशी-विदेशी दारुच्या बाटल्या असा मोठा साठा जप्त करुन तो नष्ट केला. तीन महिलांसह दहा जणांना अटक करण्यात आली. याबरोबरच रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या सात पबवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नववर्षानिमित्त मद्यपींकडून मोठ्या प्रमाणात दारु प्रशान करुन सर्वसामान्य नागरीकांना त्रास दिला जातो. या पार्श्‍वभुमीवर अवैध दारुची ठिकाणे शोधून कडक कारवाई करुन मद्यसाठा नष्ट करण्याबाबतचे आदेश अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त बच्चन सिंह यांनी दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने येरवडा येथील लमाणतांडा परिसरातील तीन ठिकाणांवर छापे घातले. तेथून गावठी दारु व रसायने जप्त करुन नष्ट केले. तर तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.

याबरोबरच करमसिंग बच्चनसिंग पाबवे (रा.जयजवाननगर, येरवडा), दत्तात्रय चव्हाण यास देशी-विदेशी कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करुन त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच विमानतळ परिसरातून अनिल पगारे (कलवड वस्ती, लोहगाव) यास, खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दिपक बाळू रिठे यास, तर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका महिलेस अटक करुन त्यांच्याकडील गावठी दारु जप्त करुन त्यांच्याकडील साठा नष्ट करण्यात आला. 

'न्यू इअर सेलिब्रेशन'साठी सिंहगडला जायचंय? मग हे वाचाच!

याबरोबरच पोलिसांकडून रात्री उशीरापर्यंत चालणारे परमीट रुम व पबची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सात पब रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार, महिला सहायक पोलिस निरीक्षक स्वाती केदार, पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलिस कर्मचारी अब्दुल सय्यद, शंकर पाटील, भालचंद्र बोरकर, राजु मचे, गणेश साळुंके, शितल शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

loading image
go to top