
नामांकीत हॉकिन्स या कुकर कंपनीच्या नावाने बनावट कुकर तयार करण्यात येत होते. या कुकरची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे : नामांकीत हॉकिन्स या कुकर कंपनीच्या नावाने बनावट कुकर तयार करण्यात येत होते. या कुकरची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने थेट कारवाई करीत तब्बल 17 लाख रुपये किंमतीचे बनावट कॉकीन्स कुकर जप्त केले.
शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पॉलीकॅब कंपनीच्या नावाने बनावट विद्युत तारांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर आता बनावट कुकर विक्री करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
- पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यासह ८ जणांना अटक; गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी पुरवली होती आलिशान गाडी
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप फुलचंद कोठारी (वय 56, रा. मंगळवार पेठ) व विनोद तखतमल जैन (वय 61, रा. शुक्रवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात कॉपी राईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉकिंन्स या नामांकित कंपनीचे बनावट कुकर तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाला कार्यवाही करण्याची सूचना दिल्या होत्या.
- पुणे जिल्ह्यात लॉकडाउन? सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओवर जिल्हाधिकाऱ्यांच स्पष्टीकरण
सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवार पेठेतील टी. एफ. कोठारी या दुकानात आणि फुरसुंगी परिसरातील गोडाऊनमधील श्री. शंखेश्वर युटेन्सिल्स अँड अप्लायन्सेस प्रा. ली. येथे एकाच वेळी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी प्रेशर कुकरचे 1 हजार 284 नग असा एकूण 17 लाख 45 हजार 955 रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच नवीन माल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे 5 हजार लोगो आणि कागदी रॅपरही हस्तगत केले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)