Pune : दंड वसुलीला नव्हे, वाहतूक नियमनास प्राधान्य; वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याशी बातचीत

पुणे पोलिस, शहर वाहतूक शाखा यांच्या वतीने वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्यातून सुरू असलेल्या अभियानास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याशी अनिल सावळे यांनी केलेली खास बातचीत.
pune police vijaykumar magar
pune police vijaykumar magarsakal

Pune - पुणे पोलिस, शहर वाहतूक शाखा यांच्या वतीने वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्यातून सुरू असलेल्या अभियानास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याशी अनिल सावळे यांनी केलेली खास बातचीत.

प्रश्न ः वाहतूक जनजागृती अभियानाचा नेमका उद्देश काय?

उत्तर : बहुतांश वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करतात. परंतु, जे नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांच्यापर्यंत वाहतूक नियमांची माहिती पोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.

प्रश्न ः कोंडीला सामोरे जावे लागते?

उत्तर : शहरात वाहनांची संख्या ४५ लाखांपर्यंत पोचली आहे. त्यात केवळ ३२ लाख दुचाकी आहेत. मेट्रो, उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. शहरात अधिक रुंदीचे रस्ते कमी आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करू.

प्रश्न ः शहरात वारंवार अपघात होणारी २३ ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) आहेत. गेल्या सव्वा दोन वर्षांत ७०० हून अधिक लोकांचा बळी गेला?

उत्तर : या अपघातांमागे रस्त्यांची परिस्थिती कारणीभूत आहे. सिग्नल व्यवस्था, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, रस्त्यांवर विजेचे दिवे नसणे हेही कारणे आहेत. परंतु, त्यात महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुधारणा करण्याबाबत नियोजन करीत आहोत.

प्रश्न ः नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या महामार्गावर अपघात वाढले आहेत?

उत्तर ः नवीन कात्रज बोगद्यापासून भूमकर चौकापर्यंत सात किलोमीटरच्या रस्त्यावर २४० मीटरपर्यंत तीव्र उतार आहे. काही चालक दोन लिटर डिझेलची बचत करण्यासाठी वाहने न्यूट्रल करतात. वाहतूक पोलिस, परिवहन विभाग, ‘एनएचएआय’ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या भागात पोलिस चौकी, रात्री पोलिस पेट्रोलिंग वाढविणार आहे.

प्रश्न ः शहरालगतच्या चारही बाजूच्या रस्त्यांवरून अवजड वाहतूक सुरू असते?

उत्तर : पुण्याची चहूबाजूने वाढ होत आहे. पर्यायी रस्ते आणि रिंग रोडची कामे पूर्ण झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल. रस्त्यांवर दुभाजक आणि सिग्नल बसविणे तसेच अतिक्रमण काढण्याची कामे करणे गरजेचे आहे.

प्रश्न ः कात्रज चौक, टिळक चौकासह शहरातील मोठ्या चौकांमध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना धावपळ करावी लागते?

उत्तर ः महापालिका आणि स्मार्ट सिटी अंतर्गत पादचाऱ्यांसाठी नवीन सिग्नल बसविण्यात

येत आहेत. मोठ्या चौकांमध्ये पादचाऱ्यांसाठी वेगळे सिग्नल बसवून रस्ता ओलांडण्याचा कालावधी वाढविण्यात येईल.

प्रश्न ः काही वाहतूक पोलिस चौकांमध्ये वाहतूक नियमनाऐवजी आडोशाला घोळक्याने थांबून कारवाई करतात?

उत्तर ः काही ठिकाणी अशा घटना घडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. वाहनचालकांना ‘टार्गेट’ करणे बरोबर नाही. मेडिकल दुकानांसमोर वाहन लावून औषधे घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर कारवाई केल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावर तत्काळ आदेश काढून अशा वाहनचालकांवर लगेच कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दंड वसुलीपेक्षा वाहतूक नियमनाला प्राधान्य दिले जात आहे.

प्रश्न ः काही ठिकाणी नो पार्किंग किंवा सूचना फलक नाहीत. झेब्रा क्रॉसिंग पट्टे अस्पष्ट आहेत. नियम मोडल्यास दंड आकारण्याऐवजी सौजन्य सप्ताह सुरू करणार आहात?

उत्तर ः चांगली सूचना आहे. त्याची अंमलबजावणी केली जाईल. सुविधांबाबत महापालिकेसोबत चर्चा करण्यात येत आहे. सर्वांच्या सहकार्याने वाहतूक नियमांबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com