

Emotional Twist Pune Policeman Missing After Posting Tribute to Himself
Esakal
पुण्यात एक पोलीस कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. निखिल रणदिवे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते यवत पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मुलीच्या वाढदिवशीच स्टेटस ठेवून ते बेपत्ता झाले. या प्रकरणी कुटुंबियांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दाद मागितल्यानंतर आता पोलीस दलाकडून शोध घेतला जात आहे.