व्हायरल पत्राबद्दल पुणे पोलिसांचे मौन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे - एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार या प्रकरणांमध्ये अटक केलेल्या रोना विल्सन यांचे कथित पत्र गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, या पत्राबद्दल पुणे पोलिसांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे पत्राच्या सत्यतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. 

राजीव गांधी यांच्या हत्येसारखी घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत घडवून आणण्याचा उल्लेख कथित पत्रात आहे. पत्राची सत्यता तपासण्यासाठी माध्यमांनी पोलिसांकडे दिवसभर पाठपुरावा केला. मात्र, पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना भेटण्यास टाळले. काही अधिकाऱ्यांनी फोन बंद केले. दरम्यान, विल्सन यांच्याकडील इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे व काही कागदपत्रांमधील सांकेतिक भाषा पडताळण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Pune Police's silence about the viral letter Koregaon Bhima Violence