Vasant More: कोथरूडच्या पुढाऱ्यांनी जरा.. तात्यांनी काढला पुण्यातील नाईट लाईफचा कच्चाचिठ्ठा, नेत्यांवर मोठे आरोप

Vasant More: लोकसभा निवडणुकीत मैदानात असलेले तिन्ही उमेदवार या प्रकरणावरुन टीका करत आहेत. वंचितचे वसंत मोरे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
-Vasant More
-Vasant Moreesakal

Vasant More

पुण्यात कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातावरुन देशात खळबळ माजली आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने पोर्शकारने दोन जणांना चिरडले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 15 तासांत जामीन मिळाला. इतकेच नाही तर या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत, जे अत्यंत धक्कादायक आहेत. अनेक नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याची देखील चर्चा होती. मात्र नागरिकांमध्ये संताप वाढल्यानंतर जामीन रद्द करुन आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली. तर विशाल अग्रवाल पोलीस कोठडीत आहेत. 

या प्रकरणावरुन पुण्यात राजकारण देखील पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत मैदानात असलेले तिन्ही उमेदवार या प्रकरणावरुन टीका करत आहेत. काल रविंद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात सोशल मीडिया वार रंगला होता. दरम्यान वंचितचे वसंत मोरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. 

कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाइफ विषयी लक्ष द्यावे, सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे, असे वसंत मोरे म्हणाले. 

-Vasant More
Pune Porsche Crash : बाल सुधारगृहात कसा असतो दिनक्रम? विशाल अग्रवालच्या आरोपी मुलाची १४ दिवस झाली रवानगी

तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एनआयबीएम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे, नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाइफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का?, असा सवाला देखील वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. 

कोणकोणत्या नेत्याचे कुठे-कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टार्गेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे. 

-Vasant More
RBI Gold Reserve: चार महिन्यात 24 टन सोन्याची खरेदी; आरबीआय इतके सोने का खरेदी करत आहे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com