Pune : ससूनच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदासाठी डॉ. धिवारे यांची असमर्थता

ससून रुग्णालयाच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी रुग्णालयाच्या अधीक्षकांची नियुक्ती
sasoon
sasoon sakal

पुणे - ससून रुग्णालयातील कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुजित धिवारे यांनी हे पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे. तशा आशयाचे पत्र रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पाठवले आहे. दरम्यान, या पत्राबाबत अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी अद्याप कोणता निर्णय घेतलेला नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ससून रुग्णालयाच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी रुग्णालयाच्या अधीक्षकांची नियुक्ती करण्यात येत होती. परंतु या वर्षात विविध कारणांमुळे तीन वेळा अधीक्षक बदलले आहेत. त्यामुळे डॉ. ठाकूर यांनी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अधीक्षकाऐवजी उपअधीक्षकांना देण्याचा निर्णय २६ सप्टेंबरला घेतला होता. त्यानुसार समितीच्या अध्यक्षपदी डॉ. धिवारे यांची नियुक्ती केली होती.

यानंतर अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाला. ललित पाटील आणि इतर काही कैद्यांना केवळ उपचारांच्या नावाखाली रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १६ मध्ये ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले. या सर्व प्रकारामुळे कैदी समितीच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. धिवारे यांच्या निर्णयामुळे पुन्हा कैदी रुग्ण समितीची पुनर्रचना करावी लागण्याची शक्यता आहे

sasoon
Sasoon Hospital : रुग्णालयातील बहुतांश कैद्यांची होणार कारागृहात रवानगी

वरिष्ठ प्राध्यापक तज्ज्ञ असल्याने ते रुग्णांवरील उपचारांबाबत अधिक योग्य निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे कैदी रुग्ण समितीचे अध्यक्षपदी वरिष्ठ प्राध्यापकांकडे सोपवावे. माझ्याकडे उपअधीक्षकपदाचा कार्यभार असल्याने ती जबाबदारीही पार पाडावी लागते. त्यामुळे मला अध्यक्ष पदाऐवजी मला सदस्य म्हणून समितीत स्थान द्यावे, अशी मागणी अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे.

डॉ. सुजित धिवारे, अध्यक्ष, कैदी रुग्ण समिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com