30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठवण्याचा निर्णय मागे - शिक्षणमंत्र्यांची माहिती

संतोष आटोळे 
बुधवार, 28 मार्च 2018

शिर्सुफळ - राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 9 वीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन - अध्यापन 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे, असा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने काढला होता. अचानक आलेल्या या आदेशामुळे शाळांचे नियोजन कोलमडणार होते. तसेच याबाबत कोणाच्याच मानसिकतेचा विचार न केल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षकांमधुन या निर्णयाबाबत नाराजी होती. परंतु, हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहिर केले.

राज्यातील सर्व शाळांमध्ये दीर्घ सुट्यांच्या संदर्भात सुसूत्रता राहावी, तसेच दीर्घकालीन सुट्ट्यांचा कालावधी निश्चत करण्याच्या उद्देशाने राज्य विद्या प्राधिकरणाने हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून उन्हाळ्याची सूटी लागू करावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. संकलित मूल्यमापनाची प्रक्रिया संपल्यानंतर अनेक शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन होत नसल्यामुळे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहात नाहीत. यामुळे प्रत्येक शाळेमध्ये संकलित चाचणी (द्वितीय सत्र परिक्षे) नंतर उन्हाळी सुट्टी सुरू होईपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असेही या आदेशात म्हटले होते.

या कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहातील अशी खबरदारी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले होते. विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे यासाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करावे, गोष्टी, नाटके, कविता यांची पुस्तके वाचणे व वाचलेल्या गोष्टी, कथा, कविता यांचे सामूहिक सादरीकरण करणे, स्थानिक कारगीरांच्या मदतीले विविध हस्तकला, चित्रकला, स्थानिक लोककला, कार्यशाळा घेणे, क्रीडा शिबीर घेणे अशा विविध उपक्रमांची यादी विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ.सुनिल मगर यांनी काढलेल्या आदेशात देण्यात आली होती. तसेच या कार्यक्रमांचे नियोजन कसे करावे ते करताना कोणती काळजी घ्यावी याबाबतही सूचना यामध्ये देण्यात आल्या होत्या. परंतु, शिक्षकांवर यामुळे कामाचा अतिरिक्त ताण आला असता. याचा विचार करुन हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Web Title: pune primary and secondary school holidays teachers