पुण्यात खासगी बसची वाहतूक जोमात; तिकिटाचे दर अवाच्या सव्वा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुणे विभागातून राज्यातील सुमारे ९० टक्के मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी बस शिवाय पर्याय नाही.
Private-Bus
Private-BusSakal
Summary

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुणे विभागातून राज्यातील सुमारे ९० टक्के मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी बस शिवाय पर्याय नाही.

पुणे - एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) संपामुळे (Strike) पुणे विभागातून राज्यातील सुमारे ९० टक्के मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी बस (Private Bus) शिवाय पर्याय नाही. परिणामी खासगी बस व्यावसायिक जोमात असून, एसटी कोमात असल्याचे चित्र आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी पुणे विभागातील १३ आगारांतील एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने थेट खासगी बसगाड्यांना पुणे विभागातील एसटी आगारातून प्रवासी बस वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर २५० ते ३०० किलोमीटर मार्गावर पश्चिम महाराष्ट्रात (मुख्यत्वे सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद) बसगाड्या स्थानकावरून धावत आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या (नागपूर, अमरावती, गडचिरोली, भंडारा, लातूर, उस्मानाबाद, बीड) मार्गावर धावणाऱ्या गाड्या स्थानकावर दाखलच झाल्या नाहीत. या मार्गासाठी खासगी बसच्या कार्यालयातून बुकिंग घेतले जाते. खासगी बसच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी करून अवाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याचे दिसून येत आहे.

Private-Bus
पुणे शहरात कोरोना रुग्णांत ३० दिवसांत दहा पटीने वाढ

एसटी बंद असल्यामुळे ऑल इंडिया परमिटवर चालणाऱ्या खासगी बसमधील प्रवाशांची संख्या ८० टक्केच आहे, राज्यातील बहुसंख्य एसटी स्थानकांवरून अजूनही खासगी बस त्या ठिकाणापासून अडीचशे किलोमीटरपर्यंत एसटीच्या दरात सेवा देत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ओमिक्रॉनच्या भीतीमुळे प्रवाशांची संख्या पंधरा टक्क्याने कमी झाली आहे. मागील दोन वर्षांत झालेले नुकसान भरून निघाले नाही.

- बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य खासगी प्रवासी व माल वाहतूक बस संघटना

ज्या खासगी बसगाड्या थेट स्थानकावरून धावतात, त्यांना एसटी बसच्‍या दरानुसारच तिकीट दर आकारावे लागते. तसेच ठरविलेल्या दरापेक्षा अधिक तिकीट दर आकारल्यास तक्रार करता येते. मात्र ज्या मार्गांवरील गाड्या स्थानकावरून धावतच नाहीत, त्या गाड्यांच्या तिकीट आकारणीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे खासगी व्यावसायिकांकडून मनमानी करून प्रवाशांची लूट केली जात आहे. यावर सरकारने नियमावली तयार करण्याची गरज आहे.

- राजेश पुराणिक, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com