

Pune ACB Traps Police Sub Inspector Taking Rs 46 Lakh Out Of Two Crore Bribe Demand
Esakal
पुणे, ता. २ : आरोपीला मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी करून, पहिल्या हप्त्यापोटी ४६ लाखांची लाच घेताना एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (ता. २) रास्ता पेठ परिसरात ताब्यात घेतले. प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५) असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, ते सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.