नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पब कडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत.
तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले आहेत. या पब व्यव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.