Pune : महामार्गावरील पाणीप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाण्यात बसून लक्षवेधी आंदोलन

पुणे-सोलापूर महामार्गावरील पाण्याचा निचरा झालेला नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Pune
Pune sakal

मांजरी : तीन दिवस होऊनही येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील पाण्याचा निचरा झालेला नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येला पालिका प्रशासनाबरोबरच सत्ताधारी जबाबदार आहेत. अद्यापही हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक प्रयत्न होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने थेट येथील पाण्यात बसून लक्षवेधी आंदोलन केले.

चार दिवसांपूर्वी सोमवारी (ता. १७) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील लक्ष्मीकॉलनी ते स्टडफार्म या परिसरातील सोलापूर महामार्गावर मोठ्याप्रमाणात पाणी साठले आहे. त्यानंतर दररोजच अशाच स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र, महामार्गावरील पाण्याचा निचरा झालेला दिसत नाही.

पालिका प्रशासन याबाबत गांभीर्याने घेत नसल्याने हा प्रश्न सुटू शकलेला नाही. सत्ताधाऱ्यांचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत या प्रश्नाकडे लक्ष वेधन्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेचे पदाधिकारी व कर्यकर्त्यांनी पक्षाचे शहर सरचिटणीस विक्रम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली थेट पाण्यात बसून लक्षवेधी आंदोलन केले.कार्यकर्ते सचिन शेवाळे, सचिन जाधव, संदीप शेवाळे, शिवम बटणे, गणेश शेवाळे, अशोक शेवाळे आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते.

शेवाळे म्हणाले, "पुणे महापालिका हद्दीतील पंधरा नंबर विठ्ठलनगर तसेच आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी या सर्व भागातील ड्रेनेज लाईन व नाले साफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून शेवाळेवाडी भागात उताराने वाहून येत आहे. लक्ष्मी कॉलनी व मत्स्यबीज केंद्राजवळून वाहणारे पूर्वीचे ओढेनाले बांधकाम व्यावसायिकांनी बुजवून टाकून इमारती उभ्या केल्या आहेत. हे ओढे पुनर्जीवित केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

वारंवार आवाज उठवूनही पुणे महापालिका व सत्ताधारी भारतीय जनता पार्टी गेली पाच वर्षे याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. रस्ता हा पाऊस पडला की जाम होतो, याला पुणे महानगरपालिका व सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे. या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष जावे म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले आहे.

हायवेने टाकलेल्या पावसाळी वाहिन्या बंद झाल्याने पाणी साठून राहत आहे. आज रात्री हायवेवर उजवीकडून डाव्याबाजूला चोवीस इंची दोन वाहिन्या टाकून पाणी काढून देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत महामार्गावरील पाण्याचा निचरा होऊन वाहतूक सुरळीत होईल.'

प्रसाद काटकर

सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com