esakal | Pune: रायगडसह १३ गड-किल्ले दत्तक घेणार : संभाजीराजे
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजे छत्रपती

रायगडसह १३ गड-किल्ले दत्तक घेणार : संभाजीराजे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परिंचे : रायगडच्या पुनर्बांधणीचे काम वेगात सुरू असून सरकारचा एकही पैसा न घेता स्वतः पुढाकार घेऊन रयतेच्या साथीने महाराष्ट्रातील तेरा गडकोट किल्ले दत्तक घेणार असल्याची घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

परिंचे (ता. पुरंदर) येथे ‘सप्तसहस्री’ गणोजीबाबा जाधव यांच्या ३१४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या राम वाघोले लिखित ‘ऐतिहासिक परिंचे गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

राम वाघोले या तरुणाने मोडी लिपीचा अभ्यास करून जुने दस्तऐवज पाहून परिंचे गावचा इतिहास लिहिला ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे छत्रपती संभाजीराजे महाराज यावेळी म्हणाले. विजय शिवतारे यांनी गावातील प्राचीन मंदिरे व जुने वाडे हे गावचे वैभव असल्याचे सांगून जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

पुस्तकाचे लेखक व मोडी लिपी अभ्यासक राम वाघोले म्हणाले, ‘‘चालुक्य राजवटीच्या काळापासून परिंचे गावचा उल्लेख मिळतो तसेच निजामशाहीच्या उद्यापासून सप्तसहस्री परिंचेकर जाधव घराण्याचे इतिहासातील योगदान दिसून येते. गावातील अनेक कुटुंबांमध्ये जुनी मोडी लिपीतील कागदपत्रे असतात. ती कागदपत्रे इतिहास अभ्यासकांपुढे मांडल्यास प्रत्येक गावाचा इतिहास प्रकाशात येण्यासाठी मदत होणार आहे.’’

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, अमरसिंह राजे जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, सरपंच ऋतुजा जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणशेखर जाधव, प्रस्ताविक पी. एस. जाधव यांनी केले. आभार विक्रमसिंह जाधव यांनी मानले. परिंचे ग्रामस्थ व राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

loading image
go to top