Platform TicketSakal
पुणे
Pune Railway Station : पुणे रेल्वे प्रशासनाने फलाट तिकीट विक्रीवर घातली बंदी
Platform Ticket Sale Stopped: मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली.
पुणे - मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने पुण्यासह सात रेल्वे स्थानकांवर ८ नोव्हेंबरपर्यंत प्रवाशांव्यतिरिक्त फलाटावर येणाऱ्यांना मज्जाव केला आहे. रेल्वे प्रशासनाने फलाट तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे.

