

Passengers Steal Railway Bed Sheets Towels and Pillows Pune Railway Recovers Loss From Contractors
sakal
पुणे: रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करताना प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन पांघरुण (बेडशीट), उशी (पिलो), टॉवेल उपलब्ध करून देते. मात्र काही प्रवासी आपला प्रवास संपण्यापूर्वी हा अंथरुण-पांघरुणाचा संच (बेडरोल) चोरी करत आहेत. पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वेतून गेल्या पाच वर्षांत २ लाख ६ हजार ४८३ बेडरोल चोरीला गेले असून, याची किंमत सुमारे ३ कोटी रुपये इतकी आहे. यात बेडशीट चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.