Pune Railway : पुणे रेल्वे विभागात रविवार ठरला ‘ब्लॉकवार’; स्वयंचलित सिग्नल यंत्रणा ‘ट्रॅक’वर

पुणे रेल्वे विभागात रविवार हा ‘ब्लॉकवार’ ठरला. ब्लॉकमुळे रविवारी महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
Pune Railway
Pune RailwaySakal

पुणे - खडकी-चिंचवड स्थानकादरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम रविवारी रात्री नऊ वाजता संपले. १० तास हे काम सुरु होते. तसेच नीरा-लोणंद व हडपसर स्थानकावर देखील तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. तीन ठिकाणांच्या कामासाठी सुमारे एक हजार कामगारांनी परिश्रम घेतले.

पुणे रेल्वे विभागात रविवार हा ‘ब्लॉकवार’ ठरला. ब्लॉकमुळे रविवारी महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र, हे काम होणे आवश्यक असल्याने रेल्वे प्रशासनाने नियोजन करून वेळेत हे काम पूर्ण केले. खडकी-चिंचवड स्थानकादरम्यान प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर एक सिग्नल बसविण्यात आला होता. तो सुरु केला.

यासह यार्डमधील छोटी मोठी कामे देखील करण्यात आली. नीरा-लोणंद दरम्यान दुहेरीकरणाचे काम करण्यात आले. तर हडपसर स्थानकावर व्यवस्थापकांच्या कार्यालयातील पॅनल बदलणे आदी कामासाठी देखील ब्लॉक घेण्यात आला होता. ते देखील काम पूर्ण करण्यात आले.

रेल्वेगाड्यांना उशीर

काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्स्प्रेस, दौड-इंदूर एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस आदी गाड्यांना पुणे स्थानकावर येण्यासाठी किमान दोन ते तीन तासांचा उशीर लागला. त्यामुळे गाडीतील व फलाटावर प्रवाशांची गैरसोय झाली.

रेल्वेच्या महत्त्वाच्या कामांसाठी तीन ठिकाणी ब्लॉक घेण्यात आले. ब्लॉकच्या वेळेत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. प्रवाशांना गाड्यांची माहिती देण्यासाठी स्थानकावर हेल्प डेस्कची सोय करण्यात आली होती.

- डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com