

Pune Railway Staff Saves Elderly Warkari After Slip From Moving Train
esakal
पुणे: पंढरपूरकडे निघालेल्या एका वयोवृद्ध वारकऱ्याचा धावत्या रेल्वेखाली जाण्याचा थरारक प्रसंग पुण्यात घडला. मात्र, प्रसंगावधान राखत एका रेल्वे कर्मचाऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे या वारकऱ्याचे प्राण वाचले. या संपूर्ण घटनेचे दृश्य स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.