Pune station new platform project cost
esakal
पुणे : पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये सहा नवीन फलाट होणार आहेत. फलाट क्रमांक ७ ते १२ असे हे फलाट असतील. या फलाटावर प्रवाशांना (Pune Railway Station) येण्यासाठी जुना मालधक्का येथून प्रवाशांना प्रवेश दिला जाईल. हे स्थानकाचे तिसरे प्रवेशद्वार असणार आहे.