Pune Mastan Baba News
esakal
25 Years of Mystery & Devotion : संपूर्ण शरीर मातीने माखलेलं, केसांचा गुंता झालेला, पायात कडं अन् अंगावर एखाद दुसरा कापड, अशी व्यक्ती जर तुम्हाला कधी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात दिसली तर तुम्ही त्याला अवलीया म्हणाल. पण साधीसुधी व्यक्ती नसून अनेकांसाठी ते देवासमान आहेत. या व्यक्तीचं नाव आहे मस्तान बाबा. काही जण त्यांना 'सरकार'ही म्हणतात. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हे मस्तान बाबा पुणे रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याचं सांगितलं जातं.