
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची आता चर्चा सुरु झाली आहे. त्यातच स्टेशनला कोणाचं नाव द्यायचं? त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. यासाठी चार विविध नावं यासाठी पुढे आली असून विविध राजकीय गटांकडून ही नावं पुढं आणण्यात आली आहेत. यामध्ये पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यासाठी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव सुचवलं आहे. तर स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.