
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केलीय. १५ दिवसात अशी पॉलिसी येईल की टोलबाबत कोणतीच तक्रार राहणार नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. मुंबईत दादर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ते अमर हिंद मंडळाच्या व्याख्यानामालेत उपस्थित होते. तिथं बोलताना गडकरी म्हणाले की, कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी लोकप्रबोधन महत्त्वाचं आहे. पण आपल्या देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता आहे.