प्रवाशांची पळवापळवी!

अविनाश पोफळे 
शुक्रवार, 17 मार्च 2017

पोलिसांचे होणारे दुर्लक्ष अन्‌ त्यामुळे होणारा वाहतुकीचा प्रश्‍न, असे विदारक चित्र पुणे स्टेशन चौकात गुरुवारी सकाळी पाहायला मिळाले.

पुणे - वाहतूक पोलिसांसमोरच प्रवाशांची सुरू असलेली पळवापळवी... खासगी वाहनांतून रस्त्यावरच उतरणारे आणि चढणारे प्रवासी... त्याच वेळी चौकाच्या चारी बाजूंनी रस्त्यावर झालेले रिक्षाचालकांचे अतिक्रमण... त्याकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्ष अन्‌ त्यामुळे होणारा वाहतुकीचा प्रश्‍न, असे विदारक चित्र पुणे स्टेशन चौकात गुरुवारी सकाळी पाहायला मिळाले.

   सद्य:स्थिती
 अधिकृत रिक्षा स्थानके ओस पडली आहेत 
 ठिकठिकाणी रस्त्यावर उभे राहून एजंटांकडून प्रवाशांची पळवापळवी 
 पोलिस घोळक्‍याने एकाच ठिकाणी थांबतात
 त्यांच्यासमोरच एजंट प्रवाशांना अडवितात
 अवैद्य प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट 
 त्याकडे पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असल्याचा कॅबचालकांचा आरोप

   उपाययोजना
 वाहतूक पोलिसांचा धाक हवा
 अवैद्य वाहतुकीस प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी
 पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याकडे लक्ष द्यावे
 रिक्षाचालकांना शिस्त लावावी
 एजंटांविरुद्ध कठोर कारवाई करावी
 रस्त्यावर वाहने उभी करू देऊ नयेत

Web Title: Pune railway station traffic