Pune Rain : धरण परिसरात कोसळधार; वीरमध्ये सर्वाधिक!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

टेमघरला सकाळपासून दहा आणि संध्याकाळी नंतर बारा असा 22 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला गावातून पुणे पानशेतत रस्त्यावर वडाच्या झाडाजवळ खोलगट भागात रस्त्यावरून दीड फूट पाणी वाहत होते.

खडकवासला : खडकवासला परिसरात शनिवारी (ता.19) सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. कोल्हेवाडी, किरकटवाडी, गोऱ्हे बुद्रुक, नांदेड शिवणे, उत्तमनगर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते. खडकवासला धरण संध्याकाळी पाच वाजल्यानंतर चार तासात 66 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान खडकवासला येथे सकाळी सहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत नऊ मिलिमीटर पाऊस पडला. संध्याकाळी 66 असा एकूण 75 मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत येथे सकाळपासून 15 संध्याकाळी 17 असा एकूण 32 मिलिमीटर पाऊस पडला आहे. वरसगाव येथे सकाळपासून 14 संध्याकाळी 15 असा एकूण 29 मिलिमीटर झाला.

टेमघरला सकाळपासून दहा आणि संध्याकाळी नंतर बारा असा 22 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला गावातून पुणे पानशेतत रस्त्यावर वडाच्या झाडाजवळ खोलगट भागात रस्त्यावरून दीड फूट पाणी वाहत होते. त्यामुळे नागरिकांना पायी जाता नव्हते. रिक्षा जाताना अडचणी येत होत्या.

शहर जिल्हा परिसरातील पाऊस पडण्याचे ठिकाणी सकाळी साडेआठ वाजल्यापासून पडलेला पाऊस येरवडा 16, कात्रज बोगदा 40, नाझरे धरण (ता.पुरंदर) 47, कासारसाई (हिंजवडी) 29, ताथवडे 25, खामगाव (ता.दौंड), मोरगाव (ता.बारामती) 41, वीर धरण 69, पळसदेव (ता. इंदापूर) 60, सणसर (ता.इंदापूर) 38, भाटघर 44 मिलिमीटर पाऊस झाला आहे.  

वीर धरण परिसरात पावसाचा जोर आणि पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सांडव्यातून 13608 क्यूसेक्सने प्रवाह रात्री 11 वाजता सोडण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार, विसर्गामध्ये बदल करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये. 
- विजय नलवडे, सहाय्यक अभियंता, वीर धरण उपविभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rain Heavy rainfall in the dam area