Pune Rain Live Updates:पुण्यात पावसाने दैना, घरांमध्ये शिरले पाणी; सिंहगड रोड बंद

टीम ई-सकाळ
Wednesday, 14 October 2020

पानशेत वरसगाव येथे पाऊस कमी आहे. पानशेत धरणातून 1500 ते 2000 क्यूसेक पाणी नदीत सोडले जाणार आहे. ते पाणी खडकवासला धरणात जमा होणार आहे. खडकवासला धरण 79 टक्के भरले आहे.

पुणे : पुणे शहर आणि परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. परंतु, दुपारनंतर हळू हळू पावसाचा जोर वाढला. रात्री आठ ते नऊच्या सुमारास पावसाने खूप जोर धरला होता. परिणामी शहरातील सखल भागांत पाणी साचले असून, अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.

आणखी वाचा - मुळा-मुठा काठाला दक्षतेचा इशारा

 • संपूर्ण सिंहगड रस्ता परिसरातील वीज पुरवठा खंडीत झालेला आहे.

 • सिंहगड रस्ता विठ्ठलवाडी पासून बंद करण्यात आला आहे. 
  विश्रांती नगर चौक संतोष हॉल चौक वडगाव ब्रिज हायवे येथे डीवाईडर वरतून पाणी वाहत आहे कृपया वडगाव धायरी आनंदनगर माणिक बाग या ठिकाणी कोणी प्रवास करत असेल तर त्यांनी तिकडे येण्याचे टाळावे.

 

 • किरकटवाडीतील मावळे आळी येथे दहा ते बारा घरांना पूर्णपणे पाण्याने वेढले आहे... लोक टेरेसवर अडकून पडले आहेत. पोलीस प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने भिंत पाडून पाणी काढून दिले जात आहे.
 • सातारा रस्ता : सहकारनगर, पद्मावती, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर या भागात रस्त्यावरून जोरदार पाणी वाहत आहे. लक्ष्मीनगर शाहू वसाहत व मार्केटयार्ड येथील आनंदनगर  येथील घरामध्ये पाणी शिरले आहे नागरिकांची झोप उडाली आहे.
 • महर्षीनगर : अनेक तासापासून जोरदार पदणाऱ्या पावसामुळे उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले. झोपडपट्टी भागातील अनेक कुटुंबाचे घरांत पाणी शिरल्याने हाल झाले, परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ विजेचा लपंडाव सुरू होता. मुसळधार पावसाच्या पाण्याचा फटका अनेक कुटुंबांना बसला, गुलटेकडी परिसरातील इंदिरानगर, डायस प्लॉट, खिलारे वसाहत, मार्केटयार्ड भागातील आंबेडकरनगरमधील अनेक घरांत पाणी शिरले. रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असताना वाहने वाहून गेल्याचे प्रकार घडले.
 • औंध, बाणेर रस्ता, सकाळ नगर, बोपोडी, पंचवटी,पाषाण, सूसरस्ता,सूस, महाळुंगे, बाणेर, बालेवाडी परिसरात जोरदार पाऊस सुरू
 • पाषाण सूसरस्ता येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले
 • बाणेर बालेवाडी परिसरात गेल्या दोन तासांत मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे.
 • वारजे माळवाडी परिसरातील बाह्यवळण महामार्ग सुरू वाहनांची फार कमी आहे. वांजळे चौक उड्डाणपूलाखाली पाणी साठलं आहे वाहतूक सुरू आहे. - फौजदार अशोक येवले
 • लक्ष्मीनगर येथील शाहू वसाहतीमध्ये अनेक घरांत 3 ते 4 फूट पाणी शिरले.
 • घोरपडीमध्ये अर्धा तासापासून वीज गेली असून, रस्त्यावर व खोलगट भागात पाणी साचले आहे.
 • ट्रेझर पार्क सोसायटीमध्ये मागील वर्षी हजारो गाड्या पाण्याखाली गेल्याने सोसायटी मधील नागरिक गाड्या बाहेर काढत आहेत. रोडवर गाडी लावायला जागा नाही नागरिकांची तारांबळ उडाली आहे.आंबिल ओढ्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सहकारनगर संतनगर अण्णा भाऊ साठे नगर येथील वस्ती मध्ये पाणी शिरले असून नागरीक घरातील पाणी काढत आहे.लक्ष्मी नगर शिवदर्शन,शाहू वसाहत, शंकर महाराज वसाहत, आनंद नगर,संभाजी नगर शंकर महाराज वसाहत या भागात घरांमध्ये पाणी शिरले आहे.
 • लेकटाऊन हौसिंग सोसायटीचे बेसमेंट मध्ये पाणी शिरत आहे.
 • सागर काॅलनी,  लालबहादुर शास्त्री काॅलनी येथील घरांमध्ये पाणी शिरले.
 • बिबवेवाडी : शहरासह उपनगरात मुसळधार पाऊस पडत असून, रस्ते जलमय झाले आहेत. मागील वर्षी आंबिल ओढ्याला आलेल्या पुराची आठवण या पावसामुळे नागरिकांना येत असून, ओढ्याशेजारील वस्ती, सोसाट्याचा भागातील नागरिक भयभीत झाले आहेत, सातारा रस्त्यावरील आंबिल ओढ्या शेजारील गुरुराज सोसायटीमध्ये नागरिक रस्त्यावर आले असून, पुन्हा मागील वर्षी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही ना या काळजीत आहेत.
 • आनंद नगर चौकात पाणी साचले आहे.

आणखी वाचा - पुणे-सोलापूर रस्त्ता काही काळ बंद, वाहतूक पुन्हा सुरू

खडकवासल्यात विसर्ग वाढणार
पानशेत वरसगाव येथे पाऊस कमी आहे. पानशेत धरणातून 1500 ते 2000 क्यूसेक पाणी नदीत सोडले जाणार आहे. ते पाणी खडकवासला धरणात जमा होणार आहे. खडकवासला धरण 79 टक्के भरले आहे. १०० टक्के भरण्यास 400MCFT पाणी कमी आहे. खडकवासला धरणातून असाच पाऊस सुरू राहिला तरि सकाळी धरण भरेल. सकाळी धरनातून पाणी सोडले जाईल. रात्री पाऊस आणि धरणात वाढणाऱ्या पाण्यावर लक्ष असणार आहे.

- विजय पाटील कार्यकारी अभियंता खडकवासला 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rain Live Updates 14 October flood situation