Pune Rain : मावळमध्ये पावसाचे रौद्र रुप ! पुणे-मुंबई महामार्गावर टेम्पो चालकासह वाहून गेला, NDRF ने खासगी बसमधील ३७ जणांचे वाचवले प्राण

Maval Flood : साते फाटा येथे टेम्पो चालक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. लोणावळ्यातील वेदांत अकॅडमी परिसरात विद्यार्थ्यांचे बचावकार्य सुरू आहे. तळेगाव, घोरवाडी परिसरात पूर, रेल्वे वाहतूक विस्कळीत आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
Severe flooding on the Mumbai-Pune highway near Maval as heavy rains disrupt traffic

Severe flooding on the Mumbai-Pune highway near Maval as heavy rains disrupt traffic

esakal

Updated on

Mumbai-Pune Highway Disrupted Due to Flood-like Situation : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरु असून मुळशी आणि मावळ तालुक्यात पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. मुसळधार पावसाने पुणे-मुंबई एक्सप्रेव ठप्प झाला असून जुन्या महामार्गाला नदीचे स्वरुप आले आहे. दरम्यान महामार्गारील साते फाटे येथे पाण्याच्या लोंढ्यात अडकलेल्या एक टेम्पो चालकासह वाहून गेला आहे. तर दुसरीकडे घोरावडी रेल्वे स्थानकाजवल एका खासगी बसमधील ३७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com