Pune Rain News : पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसाने घरे, गाड्या पाण्याखाली, आज शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Pune Rain : सोलापूर रोड, लोणी आणि कदम वाकवस्ती या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक गाड्या आणि काही घरे पाण्याखाली गेली आहेत. तर दुसरीकडे इंदापूर आणि बारामती तालुक्यातही मुसळधार पावसामुळे काही गावांत पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे.
Flooded streets in Pune after heavy rainfall; vehicles submerged and residents struggle as administration issues safety alerts.

Flooded streets in Pune after heavy rainfall; vehicles submerged and residents struggle as administration issues safety alerts.

esakal

Updated on

Summary

  1. पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे घरे, गाड्या पाण्याखाली आणि शाळांना सुट्टी जाहीर.

  2. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

  3. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला असून मुळा-मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असून, यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुण्यातील हडपसर लोणी काळभोर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक घरे आणि गाड्या पाण्याखाली गेली आहेत. आज पुण्यातील अनेक भागांतील बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com