Pune Rain News : पुण्यात ११ तासांपासून मुसळधार पाऊस, नागरिकांचे हाल; सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune Traffic Jam : लोणी-काळभोर, हडपसर परिसरातील बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पुणे सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडी झाली. तर शहरातील अनेक भागांतही वाहतूक कोंडी झाली आहे.
Vehicles stranded in long traffic jams on the Pune-Solapur Highway after heavy rainfall and waterlogging.

Vehicles stranded in long traffic jams on the Pune-Solapur Highway after heavy rainfall and waterlogging.

esakal

Updated on

Summary

  1. पुण्यात ११ तासांपासून मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय होऊन प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

  2. पुणे–सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेल्याने नायगाव–यवत मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

  3. खडकवासला धरणातून १४ हजार क्युसेक विसर्ग सुरू असून महापालिकेने खबरदारीचा उपाययोजना केल्या आहेत.

Pune Rainfall Update : पुण्यातील काही भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले असून याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. रविवारी रात्री १० वाजल्यापासून पाऊस सुरु असून दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारही जोरदार कोसळत आहे. दरम्यान यामुळे लोणी-काळभोर, हडपसर परिसरातील बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पुणे सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडी झाली. तर शहरातील अनेक भागांतही वाहतूक कोंडी झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com