वरून राजाची दमदार हजेरी; वाहतुक कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज पावसाने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हजेरी लावली, उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

वरून राजाची दमदार हजेरी; वाहतुक कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सुरळीत

महर्षी नगर - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज पावसाने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हजेरी लावली, उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. ऐन घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. बऱ्याच दिवसांनी पाऊस पडला नसल्याने नागरिकांकडे छत्र्या दिसत नव्हत्या म्हणून मिळेल त्या ठिकाणी आसरा घेण्यास नागरिकांनी सुरुवात केली. तसेच या पावसामुळे उपनगरातील खड्डयांचा प्रश्नही समोर आला. शंकरशेठ रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट व आदी भागात वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली.

पावसामुळे उपनगरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले, खड्डे चुकविताना वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले. मार्केट यार्ड, सेव्हन लव्हज चौक, गिरीधर भवन चौक, लुला नगर चौक आदी ठिकाणी खड्डयांचे प्रमाण वाढले. वाहतूक कोंडी पाहायला मिळाली नाही.

- सुधीर बनसोडे, नागरिक

पाऊस ऊन वारा असो वाहतूक कर्मचारी नेहमीच वाहतूक सुरळीत करण्यासाठी सज्ज असतात, आज पडलेल्या पावसामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला असला तरी वाहतूक कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांना शिस्त मोडू दिली नाही, वाहतूक पोलीस लक्ष ठेवून होते.

- अनिल शेवाळे, स्वारगेट वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक