
महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यात पावसाने ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून घोडनदीला पुराचे पाणी आले आहे. आंबेगाव तालुक्यात रविवारी (ता.२५) ते सोमवारी (ता.२६) सकाळी सात वाजेपर्यंत या कालावधीत १२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या ३० वर्षात प्रथमच मे महिन्यात घोडनदीला पूर आला असल्याचे नागरिकांनी सांगितले.