Video:पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून वाहत होतं पाणी; रात्री उशिरा पावसाची विश्रांती

टीम ई-सकाळ
Thursday, 15 October 2020

 मध्य वस्तीत असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या समोर रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मंदिराच्या रस्त्यावर अभूतपूर्व परिस्थिती होती

Pune Rain Updates पुणे : पुण्यात काल पावसाने अक्षरशः तांडव नृत्यू केलं. पावसाचा जोर इतका होता की, शहरातल्या रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं होतं. शहरातल्या अनेक सखल भागांमध्ये घरांत पाणी शिरलं होतं. तर, रस्त्यावर पाणी आल्यानं काही मार्ग रात्री बंद झाले होते. उपनगरांसह शहराच्या मध्यवस्तीतही प्रचंड पाऊस झाल्यानं रस्त्यांवर पाण्याचे लोंढे पुढं सरकताना दिसत होते. रात्री उशिरा मात्र पावसाने विश्रांती घेतली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी, पाऊस थांबला आहे. 

आणखी बातम्या वाचा 
मुसळधार पावसाने उडवली, पुणेकरांची झोप

पुण्यात रात्री काय घडलं? पाहा फोटो फिचर

पुण्यात काल पावसानं सगळ्यांचीच दैना केली. दुपारी सुरू झालेला संततधार पाऊस सायंकाळी रौद्र रूप धारण करेल, अशी शक्यता वाटत नव्हती. पण, सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला तो रात्री साडे अकरापर्यंत कायम होता. त्यानंतर पाऊस हळू हळू कमी होत गेला. रात्री बारानंतर पाऊस पूर्णपणे थांबला. पण, तोपर्यंत पावसाने पुण्याला झोडपून काढलं होतं. मध्य वस्तीत असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या समोर रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मंदिराच्या रस्त्यावर अभूतपूर्व परिस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune rain update dagadusheth halwai temple