
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरु असून गेल्या २४ तासांत ताम्हिणी घाटात २१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर जून महिन्यात २५१५ मिमी इतका पाऊस पडला असून यात लोणावळा, मुळशीमध्ये विक्रमी पाऊस पडला असून चेरापुंजीलाही मागे टाकले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार चेरापुंजीमध्ये अद्याप १००० मिमीचा टप्पा गाठलेला नाही.