Pune Rain News: पावसाने झोडपले; पुणेकर कोंडीत अडकले, मेघगर्जना, विजांचा कडकडाट; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल; मदतीसाठी तासभरा ५० फाेन!

urban flooding and traffic chaos Pune news: सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने पुण्यात वाहतूक कोलमडली, रस्ते नदीसदृश; झाडे कोसळून वाहनांचे नुकसान, दुचाकी पाण्यात वाहून, विद्यार्थी-नोकरदार अडकले
thunderstorm lightning chaos Pune 50 calls for help

thunderstorm lightning chaos Pune 50 calls for help

sakal

Updated on

पुणे: सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने पुणे शहरात अक्षरशः झोडपून काढले. गुरुवारी (ता. २) दुपारी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली. अवघ्या काही तासांमध्ये एनडीए परिसरात ८४ मिमी तर शिवाजीनगर परिसरात ६५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. शाळा-महाविद्यालयातून घरी परतणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि रस्त्यावरचे नागरिक पावसात अडकून पडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com