
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या दळणवळणार मर्यादा आल्या होत्या.
पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या दळणवळणार मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये 2020 मध्ये वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातही ट्रॅफीकचं प्रमाण कमी झालं, पण आता 11 महिन्यांनंतर वाहतूक कोंडी पुन्हा वाढत आहे.
लोकेशन टेकनॉलोजी एक्सपर्ट टॉमटॉमच्या TomTom रिपोर्टनुसार, पुण्यात मागील वर्षी (जानेवारी ते डिसेंबर 2020) 42 टक्के वाहतूक कोंडी पाहायला मिळाली . रिपोर्टनुसार 2019 मध्ये 59 टक्के वाहतूक कोंडी होती. एका दिवसातील सर्वाधिक 66 टक्के वाहतूक कोंडी 7 फेब्रुवारी 2020 मध्ये नोंद झाली. मागील वर्षी सकाळी वाहतूक कोंडी 44 टक्के होती, तर रात्री 68 टक्के. वाहतूक कोंडीमध्ये जगात पुण्याचा 16 वा क्रमांक लागला आहे.
धनंजय मुंडे प्रकरणात मोठी बातमी; टाकलं एक पाऊल मागे, रेणू शर्माने घेतली माघार!
मुंबईच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये शहरातील वाहतूक कोंडी 64 टक्के होती. एप्रिलमध्ये हीच वाहतूक कोंडी 0 टक्के पाहायला मिळाली. या काळात मुंबई पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये होती. 2020 मध्ये मुंबईतील वाहतूक कोंडी 53 टक्के नोंद झाली आहे. त्यामुळे जगात वाहतूक कोंडीच्या बाबतीत मुंबईचा दुसरा क्रमांक लागला आहे. मुंबईत सकाळी वाहतूक कोंडी तब्बल 86 टक्के नोंद झाली, तर सांयकाळी 62 टक्के वाहतूक कोंडी होती.
वाढदिवसानिमित्त बसपा प्रमुख मायावतींची मोठी घोषणा
वाहतूक कोंडींमध्ये 2019 मध्ये बंगळुरु शहराचा पहिला क्रमांक होता, जानेवारी 2020 मध्ये ती कमी होत 70 टक्के झाली होती. एप्रिलमध्ये 6 टक्के वाहतूक कोंडी नोंदण्यात आली. मागील महिन्यात ती वाढून 48 टक्क्यांपर्यंत गेली आहे. रिपोर्टनुसार वाहतूक कोंडीमध्ये बेंगळुरुचा जागतिक यादीत सहावा क्रमांक लागतो. दिल्लीचा या यादीत आठवा क्रमांक आहे.
दरम्यान, टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सने 2020 मध्ये जगातील 57 देशातील 400 शहरांचा अभ्यास केला. यासाठी टॉमटॉमने 60 कोटी डिवाईस वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते.